बिघडलेले गर्भाशय (irritable uterus) म्हणजे काय ?

           गरोदर स्त्रीला खूप गोष्टीची तयारी करावी लागते. आणि त्यात सर्वात महत्वाची वेळ ही डिलिव्हरीची असते. जशी- जशी डिलिव्हरीची वेळ जवळ येते. आईला मानसिक आणि शारीरिक तयार व्हावे लागते. बाळाचा जन्म जवळ येण्याचा संकेत आहे गर्भाशयाचे आखडणे. पण ज्या वेळेस सर्व काही नॉर्मल( सामान्य) असेल आणि बाळाच्या जन्माची तारीख जवळ आलेली नाही आणि एकदम गर्भाशय संकुचन ( आखडत ) असेल तर ह्या स्थितीला तुम्ही काय म्हणणार ? तर ह्याला बिघडलेले गर्भाशय (irritable uterus) म्हणतात.

बिघडलेल्या गर्भाविषयी (irritable uterus) काही माहिती

१) खोट्या प्रसूती कळा (false labour)

ह्यावेळी तुमच्या गर्भाशयात तुम्हाला खूप त्रास होतो पण बाळ बाहेर येत नाही. आणि ह्या गर्भाशयाच्या आखडल्यामुळे तुम्हाला पाठीचा किंवा कंबर दुखण्याचा त्रास होत असतो. आणि यावेळी जर तुम्ही चालाल तर आणखी खूप त्रास होईल.

२) असे बिघडलेले गर्भाशय का होते ?

याविषयी खूप काही संशोधन झालेले नाही की, एकदम कसे गर्भाशय आखडायला लागते? यावर काही तज्ज्ञाचे म्हणणे आहे की, काही वेळा चुकीचा किंवा जास्त व्यायाम, समागमाचा परिणाम, मलावरोध व गॅसची समस्या, किंवा खूप कमी पाणी पिणे.

३) बिघडलेले गर्भाशय धोकादायक नसते

ह्या समस्येमुळे स्त्रीला अस्वस्थ वाटते. त्यामुळे त्यामुळे खूप घाबरण्याची गोष्ट नसते. आणि बाळही सुरक्षित असते. ह्याला

आपण pre -term labour म्हणू शकतो. म्हणून खूप घाबरून जाऊ नका. 

४) बिघडलेली गर्भाशय कसे समजेल ?

याच्या तपासण्यासाठी पोटावर एक दाब पडणारी -पेटी लावतात (pressure sensitive belt )आणि याच्याबरोबर अल्ट्रासाउंड आणि रक्ताची चाचणी घेतली जाते.

५) बिघडलेल्या गर्भाशयावर उपचार

गरोदर स्त्रीने खूप पाणी प्यावे. डाव्या बाजूला झोपावे त्यामुळे झोपण्याच्या समस्येवर आणि दुखण्यावर आराम मिळेल. काही वेळा मानसिक ताण- तणावामुळेही अशा गोष्टी घडतात तेव्हा आनंदी आणि सकारात्मक राहण्याचा रहा. 

Leave a Reply

%d bloggers like this: