लहान मुलांचे हे फोटो घ्यायला विसरू नका

 

त्या लहानश्या जीवाचं आगमन तुमचं आयुष्य बदलून टाकते आणि आणि तुम्हाला तुमचं कुटूंब पूर्ण झाल्याचा आनंद होतो. आणि हा आनंद अवर्णनिय आहे. बाळाचा प्रत्येक क्षण कॅमरात कैद करायचा आहे. अश्यावेळी पुढील प्रकारे चे फोटो काढून त्या आठवणी जपून ठेऊ शकता. यामध्ये बाळाचे नैसर्गिक हाव भाव टिपण्याचा प्रयत्न करा.

१. माझा छोटा सुपर हिरो

बाळाचा फोटो घेताना आसपास अश्याप्रकारे सजावट करा हि त्या गोष्टी खऱ्या वाटल्या पाहिजे जसे एक दोरी ठेवा त्यावर चिमट्याने कपडे वाळत घातल्यासारखे दाखवा . आणि दुसरीकडे त्यावर बाळाला देखील वाळत घातले आहे असे दाखवा किंवा त्याला फोटोशॉप करून सुपर हिरो शक्तिमान हुनुमाना छोटा भीम किंवा इतर रूपामध्ये त्याचा दाखवा.पुढे मोठे झाल्यावर हे फोटो बघून मुलांना गंम्मत वाटेल

२.छोट्या छोट्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद करा

हि एक फोटो घररण्याची वेगळी पद्धत आहे.बाळाचे इवलुशे पाय, बोट, हात नाजूक नाजूक हाता तुमचं बोट पहिल्यांदा तुमचं बोट पकडतं तो क्षण अश्या छोट्या आणि नाजूक गोष्टी कॅमेऱ्यात कैद करून ठेवा, पुढे तुमचं मुल मोठं होईल त्यावेळी हे फोटो बघून तुम्ही पुन्हा भूतकाळात जाल

३. बहीण-भावांचं प्रेम

जूर तुम्हांला दोन मुलं असतील तर त्या दोघांचे एकत्र खेळताना भांडताना एकमेकांना समजावताना ,एकमेकांची काळजी घेताना असे दोघांचे एकमेकांबरोबरचे फोटो घ्यायला विसरू नका. पुढे हे फोटो बघून त्यांनां मजा वाटेनच आणि जर पुढे दोघांमध्ये कधी गैरसमज झाले तर हे फोटो त्यांच्यातील गैरसमज कमी करायला मदत करतील

४. फॅमिली फोटो

यह तुमच्या दोघांच्या छोट्या रुपाबरोबर फोटो घ्यायला विसरू नका आई-बाबा आणि बाळा तसेच आजी आजोबा आणि बाळ आणि पूर्ण कुटूंबाबरोबर फोटो घ्यायला विसरू नका. यामुळे छान आठवणी कायमच्या तुमच्याकडे राहतील. .

५. पाळीव प्राणी आणि खेळण्याबरोबरचे फोटो

तुमच्या बाळाचे तुमच्या पाळीव कुत्र्याबरोबर किंवा इतर पाळीव प्राणी आणि खेळण्याबरोबर गोंडस फोटो घ्या . पाळीव प्राण्यांबरोबर फोटो घेताना सावधगिरी बाळगा

Leave a Reply

%d bloggers like this: